
नांदगाव. ( प्रतिनिधी): मविप्र समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव, ता.नांदगाव जि. नाशिक येथे स्पर्धा परीक्षा केंद्र व साकार एज्युकेशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने बँक,रेल्वे, एस एस सी यासारख्या विविध विषयावर एकदिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी श्री सुरेश वराडे, संचालक साकार एज्युकेशन,नाशिक यांनी बँक,रेल्वे व एस एस सी परीक्षा संबंधी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या संस्थेच्या मार्गदर्शनामुळे श्री गजानन ढोके हे पंजाब नॅशनल बँकेत नुकतेच लिपीक पदावर निवड झाली व त्यांनी त्याबाबतचे आपले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांची परिसंवादात रूची वाढली. याप्रसंगी आदित्य धात्रक, विवेक आहिरे, सचिन घुमनार हे देखील उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन यु पाटील यांनी स्पर्धा परीक्षेचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पर्धा परीक्षा केंद्र समन्वयक प्रा.आर व्ही वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. ए एम अंकुश लवाटे यांनी मानले. या चर्चासत्रात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एस ए मराठे, भूगोल विभाग प्रमुख व विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ सी बी निगळे, प्रा एस एस शेंडगे, डॉ बी बी धोंडगे, श्रीमती एस एम आवारे, श्रीमती सी वाय आहिरे, प्रा बी पी गोरे, प्रा. बी पी गायकवाड, डॉ आर टी आहिरे, प्रा वाय आर वाघ, प्रा एस पी दोंड, महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते.
