
नांदगाव( प्रतिनिधी ): नांदगाव चे ग्रामदैवत एकवीरा देवीच्या यात्रा उत्सवानिमित्त नांदगाव येथे नांदगाव केसरी भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन शनिवार, दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४ वाजता ज.ता.का. जैन धर्मशाळा, नांदगाव येथे करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत एकूण १० महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. पनवेल, सायगाव, पिंपळगाव, भगूर, बरवीर-सिन्नर आदी विविध ठिकाणांहून स्पर्धक सहभागी झाले होते.
या स्पर्धेत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथील कु. नारायणी भालचंद्र जोशी (एफ.वाय. बी.एस्सी.) हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. तिला ट्रॉफी व रु. ४,०००/- रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
या विजयाबद्दल खेळाडू नारायणी हिला मविप्र संचालक अमित भाऊ बोरसे पाटील, प्राचार्य डॉ. एन. यू. पाटील, उपप्राचार्य डॉ. एस. ए. मराठे, क्रीडा संचालक एल. एम. गळदगे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेत १० स्पर्धकांमधून नारायणी हिला खुल्या गटात दोन वेगवेगळ्या प्रतिस्पर्ध्यांशी सामना करून यश संपादन करावे लागले, ज्यातून तिच्या उत्कृष्ट कौशल्याची प्रचिती आली.
