
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२३३ वा दिवस
स्वतःला कोणता मार्ग उपयुक्त आहे हे जाणून तो मार्ग निवडण्याची व त्या मार्गाचे अनुसरण करण्याचे स्वातंत्र्य आम्ही सर्वांना देतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची उन्नती मांसाहाराने अधिक सहज रीतीने होऊ शकते. तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची फलाहाराने. ज्याचा तो स्वतःचा असा विशिष्ट भाव असेल त्याचे त्याला अनुसरण करू द्या, पण त्याला दुसऱ्याच्या वागणुकीवर टीका करण्याचा अधिकार नाही. कारण तो जसे करीत असेल तसेच जर दुसरी व्यक्ती करू लागले तर त्यामुळे तिचे अनिष्ट होण्याचाच अधिक संभव असतो. याच कारणास्तव इतर सगळ्यांनी माझ्यासारखे वागावे असे म्हणण्याचा त्याला मुळीच अधिकार नाही. तुझा मार्ग चुकीचा आहे असे विवाहित शिष्याला सांगण्याचा अधिकार एखाद्या अविवाहित व्यक्तीला मुळीदेखील नाही, मग जबरदस्तीने त्याच्यावर स्वतःचा नीतीविषयक आदर्श लादण्याची गोष्ट तर दूरच.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर चैत्र १७ शके १९४८
★ चैत्र वद्य /कृष्ण ५
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८३
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. ७ एप्रिल २०२६
★१८९१ जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेविड लो यांचा जन्मदिन
★ १९२० प्रसिध्द सतारवादक भारतरत्न पंडित रविशंकर यांचा जन्मदिन
★ १९४८ जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) स्थापना झाली.
★ जागतिक आरोग्य दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
