
:डॉ हरी कुलकर्णी, डॉ विजय
काकतकर,डॉ राम कुलकर्णी, नरेश महाजन विश्वास ठाकूर, विनिता परांजपे, श्रीगौरी सावंत, विवेक मेहेत्रे
नाशिक( प्रतिनिधी). साहित्यातील निष्ठा लेखनातील नितळपण व जगण्यातील सर्व विषयांना स्पर्श यांतून डॉ. विनिता परांजपे यांचे लेखन वाचनीय झाले आहे. जगण्यातील साध्या सोप्या गोष्टींना त्यांनी शब्दरूप दिले आहे. असे प्रतिपादन – कवी नरेश महाजन यांनी केले. रंग रेखा,विश्वास ग्रुप,
महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे, शाखा जलालपूर), रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ विनिता परांजपे यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन झाले त्याप्रसंगी श्री महाजन बोलत होते.विश्वास हब येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
डॉ.राम कुलकर्णी म्हणाले की ज्ञानसता व्यवहारात आणल्याशिवाय त्याचे मोल कळत नाही. त्यासाठी समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक हे मनाचे व्यवस्थापन करण्याचा उत्तम मार्ग आहे. त्यातून व्यक्तिची सद्सद्विवेक बुद्धी जागृत राहते.
विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर म्हणाले की आजच्या सोशल मिडियाच्या जगात वाचन संस्कृती दूरवर चालल्याची खंत व्यक्त केली. त्यासाठी विनिता परांजपे यांचे लेखन मनाला उभारी देणारे आहे. वाचनातूनच विचार करण्याची प्रक्रिया वेगाने होते.
.प्रकाशक विवेक मेहेत्रे ,यांनी विनिता परांजपे यांच्या पुस्तकांचे विषयांचे आशयाचे वेगळेपण कथन केले. नवा विचार आणि अभिरूची असल्याचे विशद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी
डॉ. हरी कुलकर्णी यांनी श्रीगौरी सावंत यांची मुलाखत घेतली व त्यातून सावंत यांनी ज्या ध्येयाने विचाराने हा प्रवास सुरू केला त्या विषयी अनुभव मांडले.
संघर्ष, लढा आणि यश असा प्रवास त्यांनी मांडला.
डॉ विनिता परांजपे यांनी पुस्तक लेखनाचा प्रवास कथन केला.
सुत्रसंचालन श्रद्धा कराळे-काळे यांनी केले. यावेळी डॉ विजय काकतकर
अनिरुद्ध जोशी तसेच
विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
