
सोनांबे-(वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी) : सोनांबे (ता. सिन्नर) येथील श्री गोवर्धन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, सोनांबे यांच्या वतीने आयोजित 50 कोटी ठेवींचा टप्पा गाठल्याबद्दल व 61 लाखांचा नफा मिळवल्याबद्दल विशेष कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, ग्रामदैवत हनुमान तसेच संजीवनी समाधी नगेश्वर महाराज यांच्या पूजनाने शुभारंभ करण्यात आला.

यावेळी संस्थेचे चेअरमन शरद रत्नाकर यांनी संस्थेच्या मागील २५ वर्षांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. सुरुवातीच्या टप्प्यातील आव्हानांवर मात करत संस्थेने सातत्यपूर्ण प्रयत्नांद्वारे उल्लेखनीय प्रगती साधली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच संस्थेच्या जडणघडणीत योगदान दिलेले दिवंगत संचालक, सभासद यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमात सिन्नर शाखेचे सल्लागार वसंत गोसावी, बांधकाम व्यावसायिक अनिल पवार, सामाजिक कार्यकर्ते दशरथ पवार, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक पांडुरंग पवार, महाराष्ट्र राज्य उद्योजकता पुरस्कार विजेते उद्योजक तानाजी पवार आदींनी मनोगत व्यक्त करत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे “प्रारंभ ते प्रकाशपर्व” या संकल्पनेवर आधारित सहा कलशांचे पूजन होय. 2001 साली कै. रामनाथ डावरे यांनी स्थापन केलेल्या या संस्थेकडे 2006 साली पहिल्या पंचवार्षिक अखेर संस्थेकडे 17 लाखांच्या ठेवी होत्या. या पहिल्या प्रारंभ कलशाचे पूजन संस्थापक संचालक तुकाराम बाबुराव पवार, संजय बोडके, दत्तात्रय जोर्वे, श्रीमती रेखा रामनाथ डावरे यांचे हस्ते झाले. सन 2011 या वर्षाच्या 3 कोटी ठेवींच्या प्रयत्न कलशाचे पुजन संस्थेचे संचालक दिपक वारुंगसे, व्यवस्थापक संदीप घोडे, गजेंद्र सातपुते, विलास पंढरी पवार, एकनाथ भिकाजी पवार यांचे हस्ते झाले. सन 2018 च्या 8 कोटींच्या प्रदर्शन कलशाचे पूजन उद्योजक तानाजी पवार, पवार वन कार्पोरेटचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक दशरथ पवार, संस्थेचे युवा संचालक शुभम डावरे, शंकर आव्हाड यांचे हस्ते झाले. सन 2021 च्या 22 कोटींच्या प्रगती कलशाचे पूजन निवृत्त पोलीस उपअधीक्षक पांडुरंग पवार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दामु बोडके, सुरेश निवृत्ती पवार, पंढरी महिपत पवार, नंदू पवार, रामनाथ पवार, सिन्नर शाखेचे कर्मचारी सागर गुजराथी यांचे हस्ते झाले. सन 2026 च्या 50 कोटींच्या प्रशंसनीय कलशाचे पुजन सोनांबे सोसायटीचे संचालक ज्ञानेश्वर बोडके, विठ्ठल अर्जुन पवार, पोपट केरू बोडके, तानाजी जाधव, सुभाष पगार यांचे हस्ते झाले. आगामी 2031च्या अपेक्षित 100 कोटी ठेवींच्या प्रकाशपर्व कलशाचे पूजन जेष्ठ संचालक भाऊसाहेब पवार, संचालक अनिल गंगाधर पवार , बांधकाम व्यावसायिक अनिल सदाशिव पवार, तानाजी पवार, शाखाधिकारी विनोद रोकडे या मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. चेअरमन शरद रत्नाकर यांनी संस्थेचा कलश स्वरूपात सादर केलेला प्रगतीचा प्रवास सर्वांना विशेष भावला. पुढील काळात संस्थेला जिल्हा कार्यक्षेत्र मिळणार असून, तालुक्यात नव्याने दोन शाखा सुरू करण्याचा मानस असल्याची माहिती चेअरमन शरद रत्नाकर यांनी दिली. यामुळे संस्थेचा विस्तार अधिक वेगाने होणार असल्याचे स्पष्ट झाले.या कार्यक्रमासाठी विठ्ठल पवार , सुधाकर नवले, रामदास बोडके, माजी उपसरपंच तानाजी पवार, निवृत्ती बोडके, काशिनाथ गोसावी, देवराम डगळे, माजी सैनिक ज्ञानेश्वर पवार, विष्णू काळुंगे व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संचालक अनिल पवार यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घोडे व शाखाधिकारी विनोद रोकडे व कर्मचारी यांनी संयोजन केले.
