नाशिक (प्रतिनिधी): उत्तर महाराष्ट्राचा मानाचा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरणा गौरव प्रतिष्ठानचा मानाचा गिरणा गौरव पुरस्कार प्रदान सोहळा रविवार ५ एप्रिल, २०२६ रोजी महाकवी कालिदास कलामंदिर येथे डॉक्टर सुधीर गव्हाणे कुलगुरू महात्मा गांधी विद्यापीठ यांच्या हस्ते आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.भगीरथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मेडीनोवा हॉस्पिटलचे संचालक डॉ.निखिल भामरे, एम.व्ही.जी ग्रुपचे संचालक शरद देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार, कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर, महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रा.सुमती पवार, राज्य सरचिटणीस भारती निकम, जिल्हाध्यक्षा शितल कुयटे, उपाध्यक्षा भाग्यश्री चौधरी, कार्याध्यक्षा पूजा दंडगव्हाळ यांनी दिली.
यंदाच्या पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे (पुणे), न्यूज १८ लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार विलास बडे (मुंबई), नाशिक मर्चंट बँकेचे व्हा.चेअरमन प्रकाश दायमा (लासलगाव), पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (नाशिक), समाजसेवक रतन चौधरी (सुरगाणा), लोकनियुक्त सरपंच वर्षा ठाकरे (धुळे), शैलेंद्र सोनजे (मालेगाव), मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे (दिंडोरी), योगाचार्य प्रज्ञा पाटील (नाशिक), सटाणा मर्चंट बँकेचे व्हा.चेअरमन प्रकाश सोनाग्रा यांचा समावेश आहे.
महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक येथे रविवार ५ एप्रिल, २०२६ रोजी सायंकाळी ५ वा. या पुरस्काराचे वितरण होणार असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन गिरणा गौरव प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंचच्या वतीने करण्यात आले आहे.