आयडिया बॉक्स स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करतांना मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे साहेब व उपस्थित सर्व मान्यवर
नांदगाव ( प्रतिनिधी ):- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नांदगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी IDEABOX 2026 या स्पर्धेत यश प्राप्त केले. कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे साहेब, निलेश चिंचोलेकर, अशोक मार्कंड उपस्थित होते मराठा विद्या प्रसारक समाज संस्था व माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयडिया बॉक्स २०२६ ही विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण विचार विज्ञान,कुतूहल,सृजनशीलता आणि उद्योजकतेची बीजे रुजवणे हा मुख्य हेतू यामागे होता.विद्यार्थ्यांनी आपल्या रोजच्या जीवनातील छोट्या-मोठ्या समस्यांवर उपाय शोधून नवीन कल्पना,उपकरणे,ॲप्स,सवयी, सेवा,उत्पादने अथवा बदल याबाबत आपले विचार लिहून आयडिया बॉक्समध्ये सादर केले होते. नुकताच या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे,यात न्यू इंग्लिश स्कूलच्या कृष्णा कुमावत, ओम सुपेकर या दोन विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कल्पनांसाठी पारितोषिक विजेते म्हणून निवड करण्यात आली आहे . स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थी व समन्वयक उपशिक्षक गजेंद्र माताडे यांच्या या यशाबद्दल त्यांचा सत्कार समारंभ केबीटी इंजीनियरिंग कॉलेज गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड .नितीन ठाकरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.या सर्व यशस्वी विद्यार्थींचे मविप्र समाज संस्थेचे सर्व पदाधिकारी व तालुका संचालक इंजि. अमित भाऊ बोरसे-पाटील,शालेय समितीचे अध्यक्ष, विजय काकळीज व सर्व सदस्य,पालक - शिक्षक संघाचे अध्यक्ष व सर्व सदस्य,विद्यालयाचे मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.