
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२३१ वा दिवस
हिंदुस्तानातील अत्यंत निर्धन लोक किती दान करतात, त्याच्याकडे जरा विशेष कटाक्ष टाका. येथे अतिथी देवो भव ही संस्कृती आहे. कोणीही मनुष्य काहीही सोबत न घेता हिंदूस्थानात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत मुक्तपणे प्रवास करू शकतो आणि प्रत्येक ठिकाणी त्याचा मोठा आदरातिथ्य होतो. येथे जर कुठे भाकरीचा तुकडा असला तरी कोणताही भिक्षुक भुकेने मरणार नाही. दानापेक्षा मोठा दुसरा कोणताच धर्म नाही. सर्वांत चांगला माणूस तोच ज्याचा हात बाहेरच्या दिशेने असून दुसऱ्याला देण्यासाठीच सतत तत्पर असतो. नेहमी दान देता यावे यासाठीच परमेश्वराने हात बनवले आहेत. तुम्ही स्वतः उपाशी राहून आपल्या जवळील भाकरीचा शेवटचा तुकडा, अन्नाचा शेवटचा घास दुसऱ्याला दान द्या. जगात नेहमीच दात्याचे आसन ग्रहण करा. पण बदल्यात कशाचीच अपेक्षा ठेवू नका.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर चैत्र १५ शके १९४८
★ चैत्र वद्य /कृष्ण ३
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८३
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. ५ एप्रिल २०२६
★ संकष्ट चतुर्थी
★ १६६३ पुण्याच्या लाल महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली.
★ १९२२ स्त्री शिक्षणाच्या प्रवर्तक, समाजसेविका पंडीता रमाबाई यांचा स्मृतीदिन.
