नाशिक ( प्रतिनिधी) गणितासारख्या विषयाला कवितेत गुंफण तसं अवघड असतं.मात्र हे कार्य गणिताचे व्यासंगी अभ्यासक असणारे कवी विठ्ठल रहाणे यांना शक्य झाले आहे. आयुष्यरूपी गणितात ध्येयवाद अतिशय महत्त्वाचा असतो, असे प्रतिपादन विशिष्ट आचार्य पदवीप्राप्त अहिल्यानगर येथील राज्य शिक्षक पुरस्काराचे मानकरी बाबुराव गवांदे यांनी केले.औरंगाबादकर सभागृहात साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बारागाव पिंप्री येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये कार्यरत गणिताचे उपक्रमशील शिक्षक विठ्ठल रहाणे यांच्या अपूर्वा प्रकाशन प्रकाशित 'गणित गीतानंद' या शैक्षणिक गणित गीतसंग्रहाचे प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त प्राचार्य सोमनाथ कळमकर, भाऊसाहेब रहाणे, कवी विठ्ठल रहाणे, प्रा.नलिनी (संगीता) रहाणे, प्रकाशिका अपूर्वा रहाणे मंचावर उपस्थित होते श्री.गवांदे पुढे म्हणाले की, अतिशय उपक्रमशील असणाऱ्या विठ्ठल रहाणे यांनी विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करण्याचे कार्य केले आहे. हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं तर पुढील काळात उत्तम गणितज्ज्ञ तयार होतील, गणितासारख्या विषयाला कवितेत गुंफणं तसं अवघड असतं. मात्र हे कार्य गणिताचे व्यासंगी अभ्यासक असणारे कवी विठ्ठल रहाणे यांना शक्य झाले आहे. आयुष्यरूपी गणितात ध्येयवाद अतिशय महत्त्वाचा असतो, असे प्रतिपादन विशिष्ट आचार्य पदवीप्राप्त अहिल्यानगर येथील राज्य शिक्षक पुरस्काराचे मानकरी बाबुराव गवांदे यांनी केल औरंगाबादकर सभागृहात साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बारागाव पिंप्री येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये कार्यरत गणिताचे उपक्रमशील शिक्षक विठ्ठल रहाणे यांच्या अपूर्वा प्रकाशन प्रकाशित 'गणित गीतानंद' या शैक्षणिक गणित गीतसंग्रहाचे प् असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त प्राचार्य सोमनाथ कळमकर म्हणाले की, गेल्या ३० वर्षांचा आमचा स्नेहबंध आहे. उत्तम तंत्रस्नेही शिक्षक असणाऱ्या कवी रहाणे यांच्याकडून गणित विषयावरील काव्यनिर्मितीचा मनस्वी आनंद वाटतो, असेही ते म्हणाले. प्राचार्य अशोक बागुल, प्रा.डॉ.दत्तात्रय फलके, प्रा.डॉ.संजय पवार, ज्येष्ठ पत्रकार नवनाथ वाकचौरे, डॉ.अश्विनी दापोरकर, भाऊसाहेब रहाणे, गवनाथ बोऱ्हाडे, रामायणाचार्य डॉ.संजय गीते यांनीही विचार व्यक्त केले. कवी विठ्ठल रहाणे यांनी मनोगतात पुस्तक निर्मितीची माहिती दिली. विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.निखील रहाणे यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.सुवर्णा रहाणे यांनी आभार मानले