
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२२९ वा दिवस
शिवाजी महाराज हे भारतातील हजारो वर्षात निर्माण झालेले महान राजे होते. ज्यावेळी आपल्या समाजाला आणि धर्माला धोका निर्माण झाला होता, त्यावेळी त्यांनी समाजाला आणि धर्माला वाचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले, शत्रूबद्दलही आदर असणारे, शेतकऱ्यांचे वाली, प्रजा हितरक्षक, धर्मरक्षक असलेल्या शिवाजी महाराजांचे तत्वज्ञान प्रत्येक भारतीयांने जाणून घेऊन ते आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. भारताच्या अस्मितेचे यथार्थ प्रतीक असणारा भारतभूमीचा खराखरा पुत्र म्हणून शिवाजी महाराजांचा नामोल्लेख करावा लागेल.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर चैत्र १३ शके १९४८
★ चैत्र वद्य /कृष्ण १
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८३
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. ३ एप्रिल २०२६
★ गुडफ्रायडे
★ १६८० हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मृतीदिन.
★ १७८१ भारतीय धर्मगुरु स्वामी नारायण यांचा जन्मदिन
★ १९१४ भारताचे पहिले फिल्डमार्शल जनरल माणकेशा यांचा जन्मदिन
★ शिवप्रभूंच्या पवित्र स्मृतीस मानाचा मुजरा.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
