
नाशिक:-(प्रतिनिधी ) साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बारागाव पिंप्री येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये कार्यरत असलेले गणिताचे उपक्रमशील शिक्षक विठ्ठल शिवनाथ रहाणे यांच्या अपूर्वा प्रकाशन प्रकाशित ‘गणित गीतानंद’ या शैक्षणिक गणित गीतसंग्रहाचे प्रकाशन शनिवार ४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे.
ग्रंथालयभूषण मु.शं.औरंगाबादकर सभागृहात संपन्न होणाऱ्या सोहळ्यास विशिष्ट आचार्य पदवीप्राप्त अहिल्यानगर येथील राज्य शिक्षक पुरस्काराचे मानकरी बाबुराव राजाराम गवांदे, सेवानिवृत्त प्राचार्य आर.व्ही.जोशी, सोमनाथ कळमकर, बारागाव पिंप्रीच्या न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अशोक बागुल यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमास गणितप्रेमी आणि रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रहाणे परिवार आणि अपूर्वा प्रकाशन संस्थेने केले आहे.
