
नांदगाव: ( प्रतिनिधी ) एखाद्या शैक्षणिक संस्थेचा १०७ वर्षांचा प्रवास हा केवळ काळाचा महिमा नसून, तो हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या ध्येयनिष्ठेचा इतिहास असतो. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, वैजनाथ जिजाजी (व्हि.जे.) विद्यालय, नांदगाव या विद्यालयाने बुधवार, दि. १ एप्रिल २०२६ रोजी आपला १०७ वा वर्धापन दिन अत्यंत दिमाखदार आणि भावपूर्ण वातावरणात साजरा केला.

कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि दीपप्रज्वालनाने झाली. विद्यालयाचे संस्थापक कै. वैजनाथ जिजाजी रत्नपारखी आणि विद्यालयाच्या (रजि. क्र.१ )पहिले विद्यार्थी कै. मनोहर वैजनाथ रत्नपारखी यांच्या स्मृतींना मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. लक्ष्मीकांत ठाकरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेचा गौरवशाली पट मांडला. “आजचा दिवस कृतज्ञतेचा आणि अभिमानाचा आहे.

१०७ वर्षांची ही ‘तरुण’ शाळा आज जुनी कात टाकून आधुनिकतेचे नवे रूप धारण करत आहे. विद्यार्थ्यांची प्रगती हाच आमचा ध्यास असून, आजी-माजी शिक्षक आणि ध्येयवादी पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीमुळेच हे ज्ञानमंदिर आजही दिमाखाने उभे आहे,” असे भावोद्गार त्यांनी काढले. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या आणि जनसेवेत कार्यरत असलेल्या नगरसेवकांचा सत्कार.श्री. गुलाब पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

उपनगराध्यक्ष श्री. राजेश शिंदे (१९९० बॅच): यांचा सत्कार अध्यक्ष श्री. संजीव धामणे यांच्या हस्ते करण्यात आला इ ८ वी कु.आसावरी गायकवाड हिने रेखाटलेले श्री. शिंदे यांचे देखणे ‘व्यक्तिचित्र’ (Portrait) त्यांना भेट म्हणून देण्यात आले. नगरसेवक व मान्यवर: ऍड. विद्याताई कसबे, श्री. शामकांत दुसाने, श्री. पृथ्वी पाटील,श्री. दीपक पांडव, श्री. वाल्मीक टिळेकर, सौ. कल्पनाताई जगताप, श्रीमती राखी जाधव, श्रीमती योगिता खरोटे, सौ. स्वातीताई नावंदर, सौ. रूपाली पाटील, श्री. सईद रशीद शेख, सौ. गायत्रीताई शिंदे आणि पत्रकार श्री. महेश पेवाल व संजयभाऊ मोरे यांचाही यथोचित गौरव करण्यात आला. या प्रसंगी माजी शिक्षक श्री. घेवरचंद लोढा, श्री. जनार्दन साळुंखे, श्री. विष्णू निकम, श्री. शाम सोनस आणि पालक शिक्षक संघाच्या सदस्यांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला श्रीमती सुनीता देवरे (क्रीडाशिक्षिका): यांनी शाळेच्या देदीप्यमान इतिहासाची उजळणी करताना शहरातील नागरिक, व्यापारी आणि संस्थेच्या सहकार्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला विद्याताई कसबे: आपल्या शालेय आठवणींना उजाळा देताना त्या म्हणाल्या, “आज आम्ही जे काही आहोत, ते या शाळेच्या शिस्तीमुळेच आहोत. ‘कमी ध्येय असणे हा गुन्हा आहे’ ही या शाळेची शिकवण आम्हांला सदैव प्रेरणा देते.”

उपनगराध्यक्ष श्री. राजेश शिंदे: यांनी विद्यार्थ्यांना ‘जिद्द आणि योग्य मार्गदर्शक’ या यशाच्या सूत्रांचा मंत्र दिला. प्रमुख अतिथी श्री. मंदार रत्नपारखी: “पवित्र हेतू आणि उदात्त विचारांचे मूर्तिमंत रूप म्हणजे ही शाळा,” अशा शब्दांत त्यांनी शाळेच्या कार्याचा गौरव केला._

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. संजीव धामणे यांनी सांगितले की, ही शाळा केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान देत नाही, तर जागतिक बदलांशी सुसंगत असे व्यक्तिमत्व घडवते. “साध्या वर्गातून शिकून आज उच्च पदावर पोहोचलेले हे विद्यार्थीच या शाळेचे खरे भूषण आहेत,” असे त्यांनी गौरवाने नमूद केले.श्री. सुरेश नवसारे यांनी उपस्थितांचे आभार कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती. निवेदिता सांगळे ह्यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, व्यापारी, व्हि.जे. विद्यालय पालक शिक्षक संघ सदस्य उपमुख्या . डॉ. श्री. जोगेश्वर नांदुरकर, सदस्य श्री. गुलाब पाटील, श्री.भास्कर मधे, सौ. रूपाली झोडगेकर, श्री. मुकुंद बागुल, सकाळ व दुपार शिक्षक प्रतिनिधी श्री.प्रवीण अहिरे, दोनही सत्रातील सर्व शिक्षक – शिक्षिका, शिक्षकेतर सहकारी ह्यांचेसह नांदगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक,पत्रकार, विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका तथा शिक्षकेतर सहकारी वर्गाने परिश्रम घेतले._
