
नांदगाव.( प्रतिनिधी )डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने सारनाथ बौद्ध विहार येथे नृत्य स्पर्धा व वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. नांदगाव शहरातील महिला आणि मुलींनी या स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रकल्पाच्या नांदगाव तालुक्याच्या समतादूत शिल्पा मालपुरे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती उपस्थितांना दिली समाज कल्याण विभागाकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त जात पडताळणी पंधरवडा राबवण्यात येणार आहे या अनुषंगाने कॉलेजेस मध्ये विद्यार्थ्यांचे जात पडताळणीचे प्रकरण तात्काळ निकाली काढण्यात येणार आहेत याची माहिती उपस्थितताना दिली तसेच स्वाधार योजना ,एमपीएससी ,यूपीएससी योजना व पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती उपस्थित महिला आणि मुलींना दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्सव समितीच्या कार्याध्यक्ष विद्याताई कसबे यांनी केले .

वक्तृत्व स्पर्धा व नृत्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या निवृत्त मुख्याध्यापिका कल्पनाताई जगताप ,शिवसेना महिला आघाडीच्या जानवी शर्मा, योगिताताई बच्छाव जया ताई जगताप या उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निर्मला ताई केदारे ,सुनीता देहाडे ,अलकाताई रुपवते ,सुनंदाताई खेडकर, वाकोडेताई ,नयना खटके, ज्योती शिंदे ,वंदना पांडे, विजया चतुर, उषा राठोड ,हेमा राठोड आदींनी प्रयत्न केले.
