
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८७१ वा दिवस

आमचे स्नेही जेष्ठ पत्रकार *मोतीराम पिंगळे* यांची नाशिक जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या *जिल्हाध्यक्षपदी* निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !
यापुढे नांदगाव तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व 14 तालुके व मोठी शहरे या जिल्हा पत्रकार परिषदेशी जोडलेली असेल ..
💐💐💐
पत्रकार अमोल खरे
संस्थापक अध्यक्ष नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ
समाजाचे व्यवसायात्मक वर्गातून विभाजन होणे अगदी स्वाभाविक आहे. मग यामुळे नष्ट काय होईल - विशेषाधिकार. समाज जीवनात मी एक प्रकारचे काम करू शकतो तर तुम्ही दुसऱ्या प्रकारचे काम करू शकता. तुम्ही राज्य चालू शकता आणि मी पादात्राने दुरुस्त करू शकतो. पण यामुळे माझ्याहून तुम्ही श्रेष्ठ कसे ठरणार. कारण तुम्ही माझी पादत्राणे दुरुस्त करू शकाल काय? तुम्ही वेदपठण उत्कृष्ट करू शकता म्हणून तुम्ही सर्वश्रेष्ठ कसे? त्यामुळे तुम्ही मला आपल्या पायाखाली का तुडवावे का?
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १९ चैत्र शके १९४७
★ चैत्र शुद्ध /शुक्ल १२
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. ९ एप्रिल २०२५
★ वामन द्वादशी
★ १८२८ समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक गणेश वासुदेव जोशी उर्फ ‘सार्वजनिक काका’ यांचा जन्मदिन.
★ २००१ दलित साहित्यिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू शंकरराव खरात यांचा स्मृतीदिन.
★ जलसंधारण दिन.


