
नाशिक, (प्रतिनिधी)पंचवटी येथील श्री काळाराम मंदिर परिसरातील ब्रह्मनिष्ठ साध्वी परमपूज्य विमलादेवी समाधी मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन मंगळवारी झाले. यावेळी कुंभमेळा आखाडा परिषद प्रवक्ता महंत श्री भक्तीचरणदास महाराज यांच्यासह स्वामी अद्वैतानंदजी, चिन्मय मिशन यांच्या हस्ते कुदळ मारून तसेच श्रीफळ वाढवून भूमिपूजन शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी साध्वी विमलादेवी यांचे वंशज वर्षाबेन भट, निखिल भट, सीमा भट, हेतल दवे, उर्वशी दवे यांची प्रमुख उपस्थिती होती. पौरोहित्य मंदार देव यांनी केले. आमदार राहुल ढिकले यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
