
नासिक ( प्रतिनिधी) भारतीय दूरसंचार पेंशनर्स संघ या दूरसंचार विभागातील निवृत्ती वेतन धारकांच्या देशव्यापी संघटनेचे महाराष्ट्र राज्य व्यापी पहिले त्रैवार्षिक अधिवेशन, रविवार दि. २९ एप्रिल २०२६ ला कालिका माता मंदिर भक्त निवास नासिक येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाले.
भा.दू.पें.सं. ही भारतीय मजदूर संघ प्रणित असलेली, दूरसंचार विभागात गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत आहे व ती ट्रेड युनियन कायद्यांतर्गत नोंदणीकृत असलेली, एकमेव संघटना असून, अल्पावधीतच या संघटनेने निवृत्ती वेतन धारकांच्या समस्या, वेगाने सोडवित लोकप्रियता मिळवली आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री श्री किरण मिलगीर यांनी केले आपल्या भाषणात त्यांनी देशभरातील कामगारांची स्थिती व भा.म.संघ करित असलेले प्रयत्न यांची माहिती सांगितली महाराष्ट्रातील सर्व कामगारांच्या मागण्या घेऊन भा मी संघाने येत्या १६ एप्रिल रोजी मुंबई येथे एक विराट अशा आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे त्यात दूरसंचार पेन्शनर्स च्या मांगण्यां देखील निवेदनात आहेत म्हणून आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
संघटनेचे अखिल भारतीय महामंत्री श्री हरि सोवनी यांनी दूरसंचार पेन्शनर्स च्या पेंशन पुर्ननिर्धारण या प्रमुख मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले जाणार आहे त्याची माहिती दिली.

उद्घाटन पर भाषण करताना भारतीय मजदूर संघाचे महामंत्री किरण मिलगिर
डावीकडून सर्व श्री.विलास हावरे, विजय परदेशी, हरि सोवनी, प्रकाश जोशी व उदय गाडेकर.
संघटनेचे अखिल भारतीय महामंत्री श्री हरि सोवनी यांनी निवृत्ती वेतन संशोधन आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर मुद्देसूद मार्गदर्शन केले.
या अधिवेशनात आगामी तीन वर्षांसाठी नूतन कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात आली. कार्यकारिणीचे राज्य अध्यक्ष श्री प्रकाश जोशी धुळे आणि राज्य सचिव म्हणून श्री उदय गाडेकर पुणे,तर श्री किरण राजहंस पुणे कोषाध्यक्ष म्हणून आगामी तीन वर्षे संघटनेची धुरा सांभाळतील.
या अधिवेशनात संपूर्ण राज्यभरातून दोनशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. विशेषत: महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या अधिवेशनात श्री हरि सोवनी, श्री प्रकाश जोशी आणि श्री उदय गाडेकर यांचा कार्य गौरव, विशेषत्वाने करण्यात आला.
नाशिकमध्ये थाटात संपन्न झालेल्या या अधिवेशनाची, नासिक येथील सदस्यांनी श्री.विलास हावरे श्री.रवींद्र कुलकर्णी यांचे नेतृत्वाखाली अतिशय उत्तम नियोजनाने उत्कृष्ट व्यवस्था केली होती.
