
नाशिक( वार्ताहर दिलीप नारद). सोमवार रोजी ओढा ता. जिल्हा नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबुराव पेखळे (राजाभाऊ) चेअरमन संजीवन दूध संकलन व शीतकरण केंद्र ओढा यांच्या पुढाकारातून हिंदुस्तान फीड्स प्रायव्हेट लिमिटेड श्रीरामपूर या पशुखाद्य बनविणाऱ्या कंपनीच्या सहयोगातून कंपनीची सामाजिक बांधिलकी या उपकरण अंतर्गत ओढा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना राजेंद्र बाबुराव पेखळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत स्टीलचे जेवणाचे डबे तसेच टिफिन बॅगचे वाटप करण्यात आले

.यावेळी हिंदुस्तान फीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे एरिया मॅनेजर योगेश थोरात साहेब व गणेश गुळवे साहेब यांनी कंपनीच्या या उपक्रमात मागचा उद्देश सांगताना सांगितले की विद्यार्थ्यांना घरातील जेवणाची गोडी लागावी. तसेच त्यांना दिलेल्या स्वच्छ डब्यातून जेवण घेऊन येता यावे व स्वावलंबनाची सवयी लागून मुलांचे आरोग्य चांगले राहावे व जंग फूड पासून सुटका व्हावी व मुलांची शरीरयष्टी व मानसिकता चांगली राहण्यासाठी व अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याकरता घरातील सकस आहाराची मुलांना गरज आहे हे कंपनीने ओळखून मुलांना घरातील जेवणाचा डबा पालकांनी दररोज द्यावा या उद्देशाने कंपनीने वाढदिवसाच्या निमित्ताने हा उपक्रम राबविला आहे यावेळी सत्कारमूर्ती राजाभाऊ पेखळे ओढा गावचे पोलीस पाटील गजानन भोर तंटामुक्ती अध्यक्ष बबनरावजी कंक माजी सरपंच मधुकरराव पेखळे, साहेबराव पेखळे, निलेश पेखळे, ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ पेखळे ओढा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी करणारे दिलीप नारद पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ पेखळे तसेच ओढा शिलापूर लाखलगाव लाल पाटोळी येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच राजाभाऊ पेखळे यांचे पिताश्री बाबुराव पेखळे व मित्रपरिवार तसेच हिंदुस्तान सीड्स प्रायव्हेट लिमिटेड श्रीरामपूर कंपनीचे एरिया मॅनेजर योगेश थोरात साहेब गणेश गुळवे साहेब या सर्वांच्या साक्षीने सरस्वतीच्या विद्या दालनात राजाभाऊ पेखळे यांचा भव्य दिव्य असा वाढदिवस साजरा करण्यात आला.

. यावेळी मान्यवरांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करून पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना स्टीलचे जेवणाचे डबे व टिफिन बॅगचे वाटप करून समाजातील तरुण पिढीला एक नवीन आदर्श राजाभाऊ यांनी करून दिला म्हणून पंचक्रोशीतील सर्वांनी राजाभाऊंचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या
