

लेखक:- डॉ.गोरखनाथ सुकदेव देवरे
रिटायर्ड मेडिकल ॴॅफिसर ,स्वामी विवेकानंद नगर,येवला रोड, नांदगाव जि.नाशिक
॥आत्मा मालिक गुरु ओम् गुरु ओम्॥ हरिपाठ चिंतन अभंग क्र-२२
नित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ । लक्ष्मीवल्लभ तयां जवळी ॥१॥
नारायण हरि नारायण हरि । भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥२॥
हरिविण जन्म नरकचि पैं जाणा । यमाचा पाहुणा प्राणी होय ॥३॥
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड । गगनाहुनि वाड नाम आहे ॥४॥
कोणतेही साधन नित्यनेमाने, सातत्याने केले तर फळ मिळते। कोणतीही गोष्ट पुन्हा पुन्हा करणे म्हणजे अभ्यास। कोणतेही संकट येवो, कोणतीही परिस्थिती असो, नित्यनेमाने जशी साधना तसेच नामस्मरण केले पाहिजे। कोणतीही साधना, नामस्मरण नित्यनेमाने करणारा साधक दुर्लभ आहे। त्यांच्या जवळ परमेश्वर सतत [प्रकट] असतो। “पडता जडभारी। नेमा न टळे निर्धारी॥”
नारायण हरि नारायण हरि । भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या- नारायण हरि, नारायण हरि या नामाचा जो सतत उच्चार करतो, त्याच्या घरी चारी मुक्ती वास करतात।
हरिविण जन्म नरकचि पैं जाणा- मनुष्य जन्म हरिप्राप्तीसाठीच आहे। या जन्मात ईश्वराला जाणले नाही तर हा जन्म व्यर्थ जातो। याच जन्मी घडे देवाचे भजन। आणिक जे ज्ञान नाही कोठे॥१॥ मनुष्यजन्माचा उद्देशच ईश्वर प्राप्ती आहे। या जन्मात जर ईश्वराला जाणले नाही तर मोठा अनर्थ होईल असे वचन केनोपनिषदात आहे।
इह चेदवेदीदथ सत्यमस्ति, न चेदिहावेदीन्महती विनष्टिः। भूतेषु भूतेषु विचित्य धीराः प्रेत्यास्माल्लोकादमृता भवन्ति॥ केनोपनिषद-२-५॥
इस मनुष्य जन्म का मुख्य उद्देश है, उस हृदयस्थ ईश्वर को जानना। यदि हमने इस मनुष्य जन्म मे ईश्वर को नही जाना तो बहुत बडा अनर्थ हो सकता है। ऐसा केनोपनिषद् मे कहा गया. ईश्वराला जाणले नाही तर पुन्हा जन्ममरण चक्र चालू राहाते व अधर्म घडल्यास जीव यमाचा पाहूणा होतो।
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड । गगनाहुनि वाड नाम आहे- ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी नामस्मरणचे माहात्म्य काय हे जाणून घेण्याची सद्गुरु निवृत्तीनाथांकडे ईच्छा प्रदर्शीत केली, तेव्हा त्यांनी सांगीतले, ईश्वर नाम हे आकाशापेक्षाही मोठे, व्यापक आहे। “हे गगनाचे पांघरुण होय देखा॥ ज्ञानेश्वरी॥” ईश्वर आकाशापेक्षा ही मोठा आहे। नाम व नामीत काही भेद नाही, त्यामुळे ईश्वराचे नाम सुध्दा ईश्वरासारखेच अनंत आहे।
या अभंगात नित्यनेमाचे महत्व, व हरिनामाचे महत्व सांगीतले आहे। [15-01-2023]
