
नाशिक (प्रतिनिधी) नाशिकरोड येथील उद्देश शेवाळे लिखित आणि अक्षरबंध प्रकाशित ‘एकायतन’ कथासंग्रहाचे प्रकाशन मंगळवार (दि. 31) रोजी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी प्रा.ऐश्वर्य पाटेकर यांच्या हस्ते आजीचं पुस्तकांचं हॉटेल येथे सायं. 5 वाजता होणार आहे.

प्रकाशन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कथाकार सप्तर्षी माळी तर अध्यक्षस्थानी पुस्तकांची आई भीमाबाई जोंधळे या असणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी रवींद्र मालुंजकर करणार आहे. कार्यक्रमासाठी जास्तीत रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रकाशक प्रवीण जोंधळे आणि लेखक उद्देश शेवाळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
