
नासिक ( प्रतिनिधी )= किड्स किंगडम एज्युकेशन सोसायटी नासिक यांच्या वतीने माऊली लांस सिडको नासिक येथे जेष्ठ साहित्यिक सुहास टिपरे यांना श्री निलेश जाधव, एडिशनल जिल्लाधिकारी, महसूल आयुक्त कार्यालय, यांच्या शुभ हस्ते व डॉ. सौं संगीता बाविस्कर, मुख्याध्यापक, मदर तेरेसा स्कूल, श्री गोपीनाथ रोडे, अध्यक्ष, ज्ञानदर्पण पुरस्कार सोहळा समिती व किड्स किंगडम एज्युकेशन सोसायटी, नगरसेविका सौं छाया देवांग यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात अनेक वर्षा पासून केलेलं कार्य, साहित्य सेवा व सामाजिक सेवा यांचा गौरव आहे. जेष्ठ साहित्यिक सुहास टिपरे यांनी मदर तेरेसा स्कूल, मॉडर्न इंग्लिश स्कूल शिवाजी चौक इत्यादी अनेक शाळा मध्ये जाऊन वाचन संस्कृती जपण्यासाठी विद्यार्थी यांना प्रवृत्त केलें मोबाईल चा वापर व दुष्परिणाम या विषयी प्रभोधन केलें. शाळा शाळा मध्ये जाऊन विद्यार्थी यांना संद्याकाळी राम रक्षा मारुती स्तोत्र इत्यादी म्हण्यासाठी वाचन संस्कार साठी प्रवृत्त केलें. शाळे तील विद्यार्थी नियमित संद्याकाळी राम रक्षा मारुती स्तोत्र देवापाशी बसुन म्हणू लागले वाचन करू लागले मोबाईल पासून दूर गेले या विद्यार्थी मध्ये केलेल्या चांगल्या संस्कार व संस्कृती पोटी शाळे ने त्यांच्या कार्याची विशेष दखल घेऊन ज्ञानदर्पण पुरस्कार 26 ने सन्मानित केलें आहे!! सुहास टिपरे यांचे या यशा बद्दल साहित्य व समाज क्षेत्रात असलेल्या मान्यवर यांनी अभिनंदन केलें आहे!!
