
ओझर:दि.२७ वार्ताहर
प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर येथे मोफत एक्स रे तपासणी, ECG camp, जागतिक क्षयरोग दीना निमित्त 100TB टी बी मुक्त भारत अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ राजेंद्र बागुल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुजित कोशिरे वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद सुर्वे, डॉ प्राची पवार, डॉ मंजिरी सराफ,आपला दवाखानाचे डॉ रिद्धी पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ प्रतिभा जुनागडे, आरोग्य कर्मचारी, आशा सुपर वायजर, आशा,अंगणवाडी कर्मचारी, यांच्या मदतीने आरोग्य केंद्रात मोफत छातीच्या एक्स रे तपासणी होणार आहे. शिवाय अती जोखमीच्या रुग्णांची तपासणी होणार आहे सोबतच वयवंदना कार्ड भागातील दीक्षि, दात्याने जिव्हाळे, थेरगाव, परिसरातील सर्व नागरिकांनी फायदा घ्यावा .14 ते 15 वयोगटातील मुलीचे HPV लसीकरण नियमित चालू असून या लसीकरणाचा फायदा घ्यावा असे प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर यांनी केले आहे.
