
ओझर: वार्ताहर
येथील बोरस्ते विद्यालयात 27 मार्च रोजी ए आय साक्षरता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक वाटपाडे यांनी अध्यक्षीय भाषणात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे मोबाईलवरील व्हाईस असिस्टंट पासून ते ऑनलाईन शिक्षण आरोग्यसेवा शेती उद्योग व्यवसाय अशा सर्वच क्षेत्रांमध्ये ए आयचा वापर होत आहे. राष्ट्रीय धोरणानुसार इंजिनिअरिंगच्या शाखेमध्ये सुद्धा आता ए आय चा समावेश करण्यात आलेला आहे म्हणून ए आय साक्षरता केवळ पर्याय नसून आज काळाची गरज आहे असे विद्यार्थ्यांना संबोधित केले. शिक्षिका सुप्रिया भंडारे यांनी सर्व विद्यार्थी व सेवकांना ए आय साक्षरतेची प्रतिज्ञा दिली.

व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे क्रीडा शिक्षक प्रभाकर लवांड यश बोरसे महेश पिंगळ राजश्री पिंगळे अर्चना घुमरे अश्विनी ठाकरे सोनल माळोदे अनिता शिरोळे वर्षा पाटील आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. फलक लेखन सविता पवार मोनाली निकम यांनी केले. सूत्रसंचालन सुप्रिया भंडारे यांनी केले.आभार संगीत शिक्षिका शितल आहेर यांनी मानले.
