
बोरटेंभे (प्रतिनिधी ) जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा बोरटेंभे शाळेची इयत्ता ८ वीची विद्यार्थिनी कुमारी यशवंती गजानन आडोळे हिची ज्ञानयात्री उपक्रमांतर्गत दिल्ली अभ्यास दौऱ्यासाठी निवड .
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक ओमकार पवार साहेब यांचा अभिनव उपक्रम .
सर्व विद्यार्थ्यांचा विमान प्रवास व दिल्ली अभ्यास दौऱ्याचा खर्च नाशिक जिल्हा परिषद करणार .

जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा बोरटेंभे शाळेची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध .
बोरटेंभे जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी कुमारी यशवंती गजानन आडोळे स्पेलिंग बी स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून द्वितीय क्रमांक मिळवून या सहलीसाठी पात्र झाली
जिल्हा परिषद नाशिक यांच्या माध्यमातून नुकत्याच जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा घेण्यात आल्या, यामध्ये स्पेलिंग बी व मॅथ बी या स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या जिल्हाभरातील एकूण 18 विद्यार्थ्यांसाठी ज्ञानयात्री उपक्रमांतर्गत दिनांक 16 मार्च ते 18 मार्च या कालावधीत दिल्ली येथे शैक्षणिक सहल मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली आहे. विशेष बाब म्हणजे या सहलीसाठी जाण्यायेण्याची सोय विमानाने केलेली आहे तसेच तीन दिवसाचा विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च जिल्हा परिषद नाशिक उचलणार आहे . ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. अभ्यास दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवनासह संसदभवनातील चालू असलेले अधिवेशन प्रत्यक्ष पाहण्याचा योग येणार आहे . यासोबतच दिल्लीतील राजघाट, शांतीवन, किसान घाट, अटल समाधी स्थळ, नॅशनल पार्क मेमोरियल, इंडिया गेट, पंतप्रधान कार्यालयातील लाईट शो तसेच म्युझियम, लाल किल्ला, अक्षरधाम मंदिर, स्पोर्ट अँड ऍक्टिव्हिटी पार्क या स्थळांना भेट येण्याची संधी मिळणार आहे .सर्व विद्यार्थी व सन्मा. सर्व मार्गदर्शक यांना दिल्ली सहल यासाठी खूप खूप शुभेच्छा .
आदिवासी व दुर्गम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थेट राजधानी दिल्लीची सहल आणि तेही विमानाने. ….. हा अनुभव विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक जडणघडणीसाठी खूप प्रेरणादायी असेल

विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद सेमी इंग्रजी उच्च प्राथमिक आदर्श शाळा बोरटेंभे शाळेच्या मुख्याध्यापिका सरला देवरे , जनार्दन कडवे ,राजेश बावनगडे, प्रशांत बांबळे , निर्मला सांळुके माणिक भालेराव, अतुल आहिरे, दशरथ सोनवणे, अनिता बुवा , वेणु मेंगाळ या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभली आहे.*
शाळेच्या या उत्तुंग यशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ओमकार पवार शिक्षणाधिकारी प्राथमिक साईलता सामलेटी ,महेश वळवी गटविकास अधिकारी, पंचायत समिती इगतपुरी ), मंजुषा सांळुके गटशिक्षणाधिकारी इगतपुरी ,ग्रामपंचायत बोरटेंभे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, बोरटेंभे गावातील पदाधिकारी , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनु आडोळे व सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ, प्रमोद चिंचोले विस्तार अधिकारी शिक्षण
किशोर सोनवणे
विस्तार अधिकारी शिक्षण अशोक दराडे ,केंद्रप्रमुख इगतपुरी नं 2 या सर्वांनी अभिनंदन केले आहे.*
जिल्हाभरातून यशवंतीचे कौतुक होत आहे . शाळेतील मार्गदर्शक मुख्याध्यापिका सह सर्व शिक्षकांचे अभिनंदन होत आहे .
