
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२२२ वा दिवस
स्वतःच्या तन-मन-धन व जीवनाचे समर्पण करून असा सेतू बांधा की ज्यावरुन लक्षावधी लोक सहज भवसागर पार करतील. सर्व शुभशक्ती संघटित करा. श्रेयाची अपेक्षा करू नका. ज्या ध्वजाला तुम्ही अनुसरत असाल तो कोणत्या रंगाचा आहे याची चिंता करू नका. सर्व रंगांच्या संगमातून शुभ्रतेचा, प्रीतीचा एकच एक रंग, एकच दिव्यद्युती निर्माण होऊ द्या! जीव ओतून आपण केवळ काम करायचे आहे. फळाची चिंता करायची नाही, ते आपोआपच प्रकट होईल.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर चैत्र ६ शके १९४८
★ चैत्र शुद्ध /शुक्ल ९
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८३
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. २७ मार्च २०२६
★ जागतिक रंगभूमी दिन
★ १८९८ हिंदुस्थानी शिक्षणतज्ञ सर सय्यद अहमद खान यांचा स्मृतीदिन.
