
नांदगाव (प्रतिनिधी ) जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत एक स्तुत्य आणि अनोखा असा उपक्रम ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राबविला जात आहे…आणि तो म्हणजे… ज्ञानयात्री सहल. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्याची नाशिक ची ओळख व्हावी , अनेक अशी पर्यटन स्थळे पाहता यावी तसेच आपल्या जिल्हा परिषदेचे अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट व्हावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दिनांक 24 मार्च 2026 बुधवार रोजी जिल्हा परिषद शाळा बोराळे आणि जिल्हा परिषद शाळा कुसुंबीनाला या दोन शाळेच्या 31 विद्यार्थ्यांनी या सहलीचा आनंद घेतला. सहली दरम्यान माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओमकार पवार साहेब, शिक्षणाधिकारी माननीय साईलाता सामलेटी मॅडम यांची भेट घेण्यात आली . साहेबांनी तसेच मॅडम यांनी मुलांशी गप्पा मारल्या त्यांना मार्गदर्शन केले. आणि Ceo साहेबांनी चांगला अभ्यास केल्यावर माझ्या खुर्चीत सुद्धा बसता येईल अशा पध्दतीने मुलांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मुलांना तपोवन, स्वामीनारायण मंदिर , पांडव लेणी व फाळके स्मारक , पंचवटी, काळा राम मंदिर इत्यादी स्थळ दाखवण्यात आली. मुलांनी सर्वात जास्त आनंद घेतला तो city centre Mall येथे. सर्वांनी पहिल्यांदाच Sliding Stare, बघितला त्याचा आनंद घेतला. तसेच Lift म्हणजे काय आणि एक मिनिटात इतक्या वरून खाली कसे येतात. त्याचीही मजा अनुभवली. रात्री छान पैकी शेव भाजी वर ताव मारून पुन्हा आपल्या शाळेच्या गावी परतून सहलीचा समारोप झाला. या सहलीचे नियोजन बोराळे शाळेचे मुख्याध्यापक श्री. सागर सोळुंके सर तसेच कुसुंनीनाला शाळेचे मुख्याध्यापक श्री. पंकज सोनवणे सर यांनी केले. सहली साठी पूर्ण वेळ नोडल अधिकारी म्हणून वेहेळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. दिलीप शिरसाठ सर सोबत होते. त्याच बरोबर श्रीमती मनीषा देवरे मॅडम आणि अनिता देवराज मॅडम यांनीही सहभागी होऊन सहकार्य केले. यासाठी नांदगाव चे गटशिक्षणाधिकारी श्री. मयुरेश मोरे साहेब , विस्तार अधिकारी श्री. दिलीप नाईकवाडे साहेब , सोमनाथ कांबरे साहेब, योगेश थोरात साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.
