
अंदरसूल(वार्ताहर) अंदरसूल येथे एकमेव पुरातन राममंदिर असून बरेच वर्षापासून या मंदिराचे काम अपूर्ण राहिले होते गावातील दक्षिणमुखी हनुमान भक्त मंडळ सावता ग्रुप तसेच गावातील सर्व सेवाभावी मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन लोकवर्गणी जमवून भव्य दिव्य मंदिर उभे केले

व श्रीराम लक्ष्मण सीता ही त्रिमूर्तींची विधिवत स्थापना करून अयोध्या येथील राममंदिर सोहळ्याच्या दिवशी येथे भव्य दिव्य सोहळ्यात या नवीन मंदिराचा लोकार्पण सोहळ्या करण्यात आला होता श्रीराम जन्मदिन सोहळ्यास पहाटे भजन व विधिवत पूजा अर्चा आरती करण्यात येऊन दुपारी बारा वाजता श्रीराम जन्म होऊन फटाक्याच्या आवाजात रामजन्म सोहळा संपन्न झाला सर्व भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले

