नाशिक:( प्रतिनिधी ) - येथील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.शोभा रवींद्र सातभाई यांच्या पुणे येथील वैशाली प्रकाशन प्रकाशित 'आरोग्यदायी वनस्पती' या भाज्या, फळे आणि इतर वनस्पतींची आरोग्यदायी रेसिपीसहित माहिती असलेल्या मौलिक पुस्तकाचे प्रकाशन रविवार २९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे.
गंगापूर रस्त्यावरील कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात मविप्रचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या सोहळ्यास ज्येष्ठ साहित्यिका शकुंतलाताई बाळासाहेब वाघ, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, शिक्षक लोकशाही आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.रवींद्र मोरे, ज्येष्ठ विज्ञान साहित्यिक प्राचार्य डॉ.किशोर पवार, प्रकाशक विलास पोतदार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन रवींद्र सातभाई, डॉ.शोभा सातभाई, वैशाली प्रकाशन यांनी केले आहे.