
भोकर/ शेख मुजम्मील
महाराष्ट्र राज्यातील वृत्तपत्र उद्योग कमकुवत होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शासकीय जाहिरात दरात १५० टक्क्यांनी वाढ करत इतर मागण्यासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा.अशा आशयाचे निवेदन तहसीलदार भोकर मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व माहिती व जनसंपर्क मंत्री, मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांना व्हाइस ऑफ मिडीया भोकरच्या वतीने देण्यात आले आहे.
तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,राज्यातील वृत्तपत्र उद्योग हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून सध्या तो गंभीर आर्थिक संकटात जात आहे. सन २०१९ पासून कागद, मुद्रण, साहित्य, वीज व इतर खर्चात सुमारे १५०% वाढ झाली आहे. मात्र शासकीय जाहिरात दरात त्या नुसार वाढ झालेली नाही. त्यामुळे विशेषता लघु व माध्यम वृत्तपत्राचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तसेच या सोबत अनेक मागण्या सुध्दा करण्यात आल्या आहेत.यात शासकीय जाहिरात दरात किमान दीडशे टक्के वाढ करावी. ई टेंडर व शासकीय जाहिराती पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध कराव्यात. जाहिरातीसाठी किमान २०० चौ.सें आकार निश्चित करावा. जाहिरात देयखे तीस दिवसात अदा करावीत. विलंब झाल्यास व्याज द्यावे. लागू व माध्यम वृत्तपत्रांना जाहिरात वाटपात समान संधी द्यावी. सर्व शासकीय जाहिराती माहिती खात्यामार्फत देण्याची सक्ती करावी. प्रलंबित तपासण्या पूर्ण करून पात्र वृत्तपत्रांना नैसर्गिक दरवाढ लागू करावी. दहा वर्ष सेवा असणाऱ्या पत्रकारांना आधी स्वीकृती व वीस वर्षे सेवा व वय ५५ वर्ष पूर्ण पत्रकारांना पेन्शनचा लाभ द्यावा. माननीय नामदार मुख्यमंत्री साहेब वृत्तपत्र उद्योग कमकुवत झाल्यास जनतेच्या माहितीच्या अधिकारावर परिणाम होईल. त्यामुळे या मागण्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. असे निवेदनात म्हटले आहे. भोकर तालुका व्हाईस ऑफ मीडिया च्या वतीने तहसीलदार भोकर यांना दिलेल्या निवेदनावर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष नाईक किनीकर, मराठवाडा महिला अध्यक्ष ज्योती सरपाते, तालुका अध्यक्ष संतोष रतनवार, तालुका उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अनिल डोईफोडे, माजी तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ बोईनवाड, लक्ष्मण कदम, सुरेश दरबस्तवार, पि.बोंदीरवाड,आशिष सोनुले यांच्या सह्या आहेत.
