
“इतिहास हा राष्ट्राचा आणि समाजाचा प्रबोधक असतो” हे ब्रीदवाक्य घेऊन गेली तब्बल पाच दशके मराठ्यांच्या इतिहासाची सेवा करणारे डाँ. जयसिंगराव पवार यांचे आज निधन झाले.
गेली सलग पन्नास वर्ष पवार सरांचे महाराष्ट्र इतिहास लेखणाचे कार्य सूरू होते. छत्रपती संभाजी महाराज स्मारक ग्रंथाच्या दर्जेदार कामापासून ते महाराणी ताराबाई साहेब, शिवपुत्र राजाराम महाराज, सेनापती संताजी घोरपडे अशा मराठ्यांच्या इतिहासातील महान पराक्रमी पण इतिसकारांनी दखल न घेतलेल्या अनेक चरित्रांवर पवार सरांनी आपल्या संशोधकिय लेखणीतून प्रकाश टाकला. एक प्रकारे ही विस्मरणात गेलेली चरित्रे नव्याने उजेडात आणली.
राजर्षी शाहू स्मारक ग्रंथाचे लेखन संपादन हे इतिहास मांडणीचा मानदंड ठरावा. शाहू महाराजांचे जीवन व कार्य लोकांपर्यंत पोहोचवणे हे पवार सरांनी आपले लाईफ मिशन मानले होते. शाहू महाराजांच्या जीवनावरील फक्त ग्रंथाची निर्मिती केली नाही तर हा ग्रंथ भारतातील आणि विदेशातील अनेक भाषांमध्ये प्रकाशित करून शाहू चरित्र सर्वदूर पोहोचावे म्हणून प्रयत्न केलेले पवार सर हे पहिली व्यक्ती ही आहेत.
महाराष्ट्र इतिहासाची अशी सेवा करत असतानाच सरांनी राजर्षी शाहू स्मारक भावन सारख्या एका महत्त्वाच्या सांस्कृतिक केंद्राच्या संचालक पदापासून ते शिवाजी विद्यापीठातील शाहू संशोधन केंद्राच्या संचालक पदापर्यंतची धुरा गेली अनेक वर्ष आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलली होती .
सरांनी माझ्यासारख्या अनेकांना इतिहासा चा अभ्यास करून इच्छिणाऱ्या तरुणांना, व्यक्तींना मार्गदर्शन करून इतिहास लेखन कसे करावे, इतिहास संशोधनाच्या पायऱ्या कशा चढाव्यात याचे योग्य मार्गदर्शन केले होते. पवार सर हे मराठ्यांचा सत्य इतिहास मांडू इच्छिणाऱ्या अनेक अभ्यासकांचे आधारवड होते.
सतत कार्यरत राहून मराठाबहुजनांचा सत्य इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून पवार सरांनी घेतलेला ध्यास हा त्यांना लोका़च्या मनातील “महाराष्ट्रभूषण”ठरवतो.
जेष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार सर अमर रहे!
इंद्रजीत सावंत,
26-3-2026
कोल्हापूर
