
नांदगाव (प्रतिनिधी) सकल जैन समाज नांदगाव यांच्या वतीने भगवान महावीर जयंती उत्सवानिमित्त शहरात सोमवार दिनांक ३० व मंगळवार दि.३१ रोजी मांस विक्री बंद ठेवण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे यासंदर्भात तहसीलदार पोलीस निरीक्षक तसेच नांदगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे भगवान महावीर जयंती हा जैन समाजाचा प्रमुख धार्मिक उत्सव असून या कालावधीत अहिंसेचा संदेश जपण्यासाठी शहरात मांस विक्री बंद ठेवावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली यामुळे समाज भावना जपल्या जातील व उत्सव शांततेत पार पडेल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी ओसवाल शेतामध्ये संघाचे अध्यक्ष दत्तराज छाजेड, खंडेलवाल दिगंबर,जैन पंचायतीचे अध्यक्ष सुमेर कासलीवाल, मंत्री शरद लोहाडे,सुदेश गंगवाल,ललित काला,पियुष काला, भारतीय जैन संघटनेचे निलेश सुराणा, सम्यक पारख,मनिष बाकलीवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
