पिंपरी हवेली ( प्रतिनिधी ) "गुढीपाडवा,पट वाढवा" उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरमाथा पिंपरी हवेली येथील शाळेत पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२६/२७ मध्ये इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू करून सुमारे दाखल पात्र १४ विद्यार्थ्यांचे प्रवेश फॉर्म भरून घेण्यात आले.दाखल पात्र विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प,पायांचे ठसे घेऊन तसेच पेढे भरून अनोखे असे स्वागत करण्यात आलेमुख्याध्यापक कल्याण पाटील सर यांनी आपल्या प्रास्ताविकात "गुढीपाडवा,पट वाढवा"उपक्रमाची माहिती उपस्थितांना देऊन दाखलपात्र एकही मूल शाळेपासून वंचित राहणार नाही यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले असता,सर्वांनी त्यास संमती दर्शवली.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य, पदाधिकारी,ग्रामस्थ,पालक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक रामचंद्र पाटील सर यांनी केले,तर मुख्याध्यापक कल्याण पाटील सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.