
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२२१ वा दिवस
श्रीराम हे सत्याचे आणि नीतिमत्तेचे मूर्तिमंत रूप होते, ज्यांनी जीवनात उच्च मूल्यांचे पालन केले. जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येते, तेव्हा श्रीराम हे संघटनशक्ती आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतात. राम हे केवळ एका धर्माचे नसून, अखिल मानवजातीसाठी मार्गदर्शक आहेत. रामचंद्रांनी समाजासाठी आणि कर्तव्यासाठी आपल्या सुखाचा त्याग केला, जो एक महान आदर्श आहे. रामासारखा आज्ञाधारक मुलगा, एकनिष्ठ पती, धाडसी भाऊ आणि प्रजापालक राजा होणे हे प्रत्येक भारतीयाचे ध्येय असावे. राम हे निर्भयता आणि ध्येयवादाचे प्रतीक आहेत.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर चैत्र ५ शके १९४८
★ चैत्र शुद्ध /शुक्ल ८
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८३
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. २६ मार्च २०२६
★ श्रीराम नवमी
★ समर्थ रामदास स्वामी जयंती
★ राम नवमी उत्सव शिर्डी
★ राम नवमी उत्सव शेगाव
★ १९०९ साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतकचे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर यांचा जन्मदिन.
★ २००८ जेष्ठ दलित साहित्यिक बाबूराव रामजी बागूल यांचा स्मृतीदिन.
★ २०१२ सिध्द-हस्त कवी प्रसिद्ध गीतकार माणिकराव सिताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांचा स्मृतीदिन.
तुझमें राम मुझमे राम, सबमें राम समाया है I
करलो जगतमें प्यार सभीसे कोई नही पराया है I
रामो राजमणि: सदाविजयते रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोSस्म्यहम्।
रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर
॥३७॥
श्रीरामजन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा
।। सियावर रामचंद्र की जय ।।
।।श्रीराम जय राम जयजय राम ।।
