
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ गायकर यांजकडुन –
इराण,इस्राएल व अमेरिका यांच्या युद्धामुळे आखाती राष्ट्रात युद्धाचा भडका उडाला आहे. याचा गंभीर परिणाम गँस , नैसर्गिक वायु, पेट्रोल व डिझेल आदीसह फर्टिलायझर सामानावर झाला आहे.त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढणार, ते मिळणार नाही, दर वाढतील, पंप बंद होणार आहे अशा निराधार अफवा पसरवल्या जात आहे.या अफवानां बळी पडुन नागरिक पेट्रोल पंपावर गर्दी करत असुन वाहनाच्यां टाक्या फुल्ल करत आहे.
या अफवामुळे पेट्रोल पंप गर्दीने अक्षरश फुलुन गेलेले आहे.
दरम्यान पेट्रोल वा डिझेलचा कुठेही तुटवडा नाही.तो साठा पुरेसा आहे. लोकानीं विनाकारण घाबरुन जाऊ नये.अफवा पसरवु नये.वा अफवा वर विश्वास ठेऊ नये असे प्रशासन वांरवार सांगत असतानांही लोक मात्र ऐकायला तयार नाही असे चित्र दिसत आहे.
या अफवाचें लोण आता ग्रामिण भागातही पसरत असुन नागरिक यामुळे त्रस्त झाले आहे.
ग्रामिण भागात गँस तुटवडा ?
एल.पी.जी.व भारत गँसचा ग्रामिण भागात तुटवडा दिसत येत असुन घरपोहोच येणारे गँस सिलेंडर आता मिळेनासे झाले आहे.
यामुळे ग्रामिण भागातील जनतेस गँस सिलेंडर साठी शहरात धाव घ्यावी लागत असुन वाहतुकीच्या खर्चाचा अतिरिक्त फटका बसत आहे.
…पुन्हा सरपणाकडे
पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या उज्वला गँस योजनेमुळे ग्रामिण भाग मोठया प्रमाणावर चुलमुक्त व धुरमुक्त झाला होता.आता गँस तुटवडयामुळे ग्रामिण भागात बहुसंख्य घरात चुली पेटल्या असुन पुन्हा एकदा धुराची संगत करावी लागत आहे.
तसेच जळणासाठी आता सरपण गोळा करण्याची वेळ आली असुन पुन्हा एकदा वृक्ष तोडीला जोरदार सुरुवात होण्याची साधार भिती व्यक्त होते.
पाणी बॉटल,तेल, प्लॉस्टिक पिशव्या,दाळी साळी आदी अनेक वस्तु महागल्या आहेत.
