
ओझर: (वार्ताहर) माधवराव बोरस्ते विद्यालयात श्रीराम नवमी निमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. अध्यक्षीय भाषणात वाटपाडे यांनी श्रीराम जन्म व रामायणातील विविध प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच नाशिक मधील पंचवटी तपोवन या भागामध्ये श्रीरामाचे वास्तव्य कसे व किती काळ होते याविषयी माहिती दिली. महाराष्ट्र केसरी श्री हर्षवर्धन सदगीर या कुस्तीपटूचेही अभिनंदन करण्यात आले. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे शिक्षक आत्माराम शिंदे क्रीडाशिक्षक प्रभाकर लवांड उज्वला जाधव मनोरमा सोमवंशी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. फलकलेखन सविता पवार मोनाली निकम मोहन क्षीरसागर यांनी केले. संगीत शिक्षिका शितल आहेर व गीतमंचाने श्रीराम यांच्या विषयी काव्य श्लोक व कविता सादर केल्या. सूत्रसंचालन उज्वला जाधव यांनी केले. आभार संगीत शिक्षिका शितल आहेर यांनी मानले.
