
दरम्यानच्या काळात आपापल्या शाखेत, जिल्ह्यात करावयाच्या कृतीशील कार्यक्रमांसाठी….
🌹प्रबोधनात्मक घोषणा/ वाक्ये… 🌹
१)लिंबू मिरची तोडा, मंत्र – तंत्र सोडा..विवेकाशी नाते जोडा…
२) चला ,प्रत्येक जण प्रयत्न करू..
भोंदू मुक्त घर आणि गाव साकारू…
३) मुहूर्त, कुंडली, पत्रिका, राशिभविष्य…..
नक्की विश्वास ठेवा..
खरंच याशिवाय जगता येते…
खूप सुंदर ,आनंदी व समाधानी आयुष्य…
४) नको नको रे ज्योतिषा…
हात माझा नको पाहू ,
माझे भविष्य मला कळे,
माझ्या दारी नको येऊ..
५) अहो..
अध्यात्मिक बुवाबाजी, भोंदूगिरी..
हीच तर समाजाची महाभयंकर बिमारी..
६) ऐसे कैसे झाले भोंदू ..
कुकर्म करुनी म्हणती साधू..
७) खात्री होता भोंदूगिरीची ..
तक्रार नोंदवा भोंदूबाबाची…
८) संचित, नशीब, प्राक्तन..
ह्या तर केवळ कल्पना…
म्हणून तर मन, मनगट, मेंदू..
हे आपले अवयव उपयोगात आणा..
९) भोंदूबुवा जर एवढा मोठा अवतारी /चमत्कारी ….
विचारा त्याला…
बाबारे, मग तू का चढतो दवाखान्याची पायरी?
१०) मंगळ ग्रहावर उतरले आपले यान….
तरी मंगळाला का करतो आपण बदनाम ?
११) शनि बिचारा हवेचा सुंदर गोळा..
तरी ज्योतिषी सांगतो साडेसाती आली,पळापळा….🏃🏿♀️
१२) आकाशातील ग्रह, तारे..
सर्वच आहेत निर्जीव बिचारे..
मग ते कसे करतील,
तुमचे नुकसान बरे ?
१३) भोंदूंची जगण्याची रीतच न्यारी..
अफू , गांजा लागतो टनावारी..
मग विचार तर करा …..
तरीसुध्दा आपण का जातो,
भोंदूंच्या दरबारी?
१४) लोकहो ,
शहाणपणाने विचार व वर्तन करा…
भोंदूगिरीला देऊ नका थारा..
१५) भोंदूंनो ऐका..
सोडा रस्ता भोंदूगिरीचा…
चाला रस्ता विवेकाचा…
हाच मार्ग खरा सुखी जीवनाचा..
१६) शिक्षणातून विकसित करा वैज्ञानिक दृष्टिकोन…
तरच अंधश्रद्धामुक्त जगता येईल जीवन..
१७) जादूटोणा विरोधी कायदा समजावून घ्या..
उल्लंघन करणाऱ्याला पोलिसांत द्या.
१८) उपचारासाठी जर जाल भोंदूच्या दारी..
तर सदैव शोषणच पडेल तुमच्या पदरी..
१९) तुम्ही, आम्ही एकमेकांच्या सुखाचे सोबती…
नका देऊ आयुष्याची दोरी, ज्योतिषी आणि भोंदूंच्या हाती..
२०) माय ,भगिनींनो वेळ नाही बरी..
आपणच सक्षम व्हावे..
आणि बाळगावी सावधगिरी…
२१) भोंदूंचा नाद सोडा..
मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडा..
२२) सम्यक स्वतंत्र विचार, निर्भय मानस आणि नैतिकतेसह खंबीर कृती..
करा ह्या सवयींची स्वतःला सक्ती..
तेव्हाच होईल तुमची ..
मानसिक गुलामगिरीतून मुक्ती…
धन्यवाद
— डॉ ठकसेन गोराणे..
२५/३/२०२६
