
तालुका प्रतिनिधी हिमायतनगर शेख मुजम्मील
हिमायतनगर. तालुक्यातील मौजे पळसपुर येथे मोकाट खर्जेल्या कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आता मोकाट कुत्र्यांनी गावातील बालकांना लक्ष केले आहे. दि. २१ शनिवार रोजी पळसपुर येथील श्रीराम चांदराव वानखेडे वय ४५ वर्ष यांच्यासह कुमारी शिवन्या योगेश जाधव वय ५ वर्ष, निरंजन हनुमान गाडगेवा वय २ वर्ष यांना मोकाट खर्जेल्या कुत्र्यांने चावा घेतला आहे. तसेच मोकाट कुत्र्यांना खाज सुटली आहे. ते कुत्रे ठिकठिकाणी उभे टाकून अंग खाजवत आहेत. त्यामुळे गावातील अनेक नागरीकांना अंग खाजत असल्याचे लक्षण आढळून येत असून रोगराई पसरण्याचा धोका वाढला असल्याने आरोग्य विभागासह ग्रामपंचायत प्रशासन या खर्जेला मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे . या कुत्र्यांपासून ज्येष्ठ नागरीकांसह बालकांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी पाळीव कुत्रा आहे त्यांनी त्यांच्या कुत्र्यांचा बदोबस्त करावा अशी गावातील नागरीकांमधुन बोलल्या जात आहे. तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांनी मोकाट कुत्र्यांची विल्हेवाट लावावी अशी मागणी सुज्ञ नागरीकांमध्ये होत आहे.
