
हिमायतनगर प्रतिनिधी शेख मुजम्मील
दिनांक २४ मार्च २०२५ रोजी अवैध गुटखा पान मसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ विरोधात हिमायतनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली तब्बल ४ लाख ८८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त याप्रकरणी एका विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २३ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजून २० मिनिटांना पोलिसांना गोपीनीय माहिती मिळाली होती की शहरातील शेवाळा बाबा वाळीत परिसरात अवैध गुटखा व पान मसाल्याची साठवणूक करून विक्री सुरू आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला छाप्यात सय्यद सत्तार सय्यद खालील वय वर्ष ४८ राहणार पोटा बु. तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड यांच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात गुटका व पान मसाल्याचा साठा आढळून आला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन ४ लाख ८८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये विविध कंपन्याचे पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थाचा समावेश असून त्यात गोवा १००० पान मसाला केसर युक्त वजरी जी.आय.जर्दा विविध ब्रँडचे पान मसाले सुगंधित तंबाखू तसेच मस्तानी २१६ व प्रीमियम दर्जाचे तंबाखू उत्पादने यांचा समावेश आहे याप्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा र.क्रमांक ५२/२५ नुसार भारतीय दंड संहिता कलम १२३,२७४,२७५ तसेच संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याची नोंद दिनांक २४ मार्च २०२६ रोजी पहाटे करण्यात आली ही कारवाई पोलीस निरीक्षक अविनाश कुमार भारतीय पोलीस सेवा नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी आणि हिमायतनगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अमोल भागात सह पोलिस निरीक्षक विशाल वाटोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल १२७२ चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मिलिंद कात्रे श्याम नागरगोजे पोलीस हवलदार २२०४ बालाजी पाटील महाराष्ट्र पोलीस ची ३१३१ सपना सूर्यवंशी सर्व अधिकाऱ्यांचे पथकाने छाप्यात सहभाग घेतला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात गुटखा व पान मसाल्यावर बंदी असतानाही काही ठिकाणी अवैधरीच्या साठवणूक व विक्री केली जात आहे अशा प्रकरणावर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून पुढील काळातही अशा धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले दरम्यान नागरिकांनी अवैध धंद्याबाबत माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना कळून संपर्क करावे असेही आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले
