
नाशिक:- येथील ज्येष्ठ साहित्यिक तु.सी.ढिकले यांच्या पुणे येथील वैशाली प्रकाशन प्रकाशित 'राहिले ते तीर्थ... (आत्मबंधात्मक ललित) आणि 'भाजके फुटाणे अन् खारे शेंगदाणे
(विडंबन गीतसंग्रह) या दोन पुस्तकांचे प्रकाशन शनिवार २८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे.
ग्रंथालयभूषण मु.शं.औरंगाबादकर सभागृहात संपन्न होणाऱ्या सोहळ्यास आमदार राहुल ढिकले, मविप्रचे अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, ज्येष्ठ साहित्यिक नरेश महाजन, संवेदनशील साहित्यिक विवेक उगलमुगले, प्रसिद्ध विडंबनकार संजय आहेर या मान्यवरांसह प्रकाशक विलास पोतदार, नाशिक पोलीस उपअधीक्षक रामराव ढिकले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन वैशाली प्रकाशन, य.सी.ढिकले, डॉ.प्रसाद ढिकले, अलका ढिकले, चारुशीला ढिकले, गिरणा गौरव प्रतिष्ठान आणि गिरजा महिला मंच यांनी केले आहे.
