
डॉ. श्यामसुंदर झळके,सिन्नर (नाशिक)
सिन्नर (प्रतिनिधी) समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ,सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या व्यक्तीला शिवप्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने सन्मानित करण्यात येते.सिन्नर येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.श्यामसुंदर झळके सिन्नर (नाशिक )यांच्या विविधांगी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची शिवप्रतिष्ठान ने राज्यस्तरीय महाराष्ट्र समाज रत्न पुरस्कार २०२६ ” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. गेल्या ३५/४० वर्षांपासून डॉ.झळके यांचे सामाजिक कार्यासोबत त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,ग्राहक पंचायत महाराष्ट्र,प्रवासी महासंघ, यांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. त्यांना मानाचा राज्यस्तरीय “महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार २०२६” जाहीर झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत तारीख २४मे २०२६ रोजी आळंदी देवाची, पुणे येथे होणार असल्याची माहिती शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष मदन रेनगडे यांनी दिली.
