
मुळडोंगरी ( प्रतिनिधी) सरस्वती माध्यमिक विद्यालय मूळडोंगरी, येथे दि.23 मार्च ,*आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाने क्रांतीचा दीप प्रज्वलित करणारे भारताचे सुपुत्र महान क्रांतिकारी, भगतसिंग ,राजगुरू, सुखदेव यांचा *शहीद दिवस* मोठ्या श्रद्धेने साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष मान. श्री एस.जी. राठोड साहेब, सचिव श्री सिद्धांत दादा राठोड यांच्या अध्यक्षतेखाली व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ बोरसे एस एस मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमतः भारत मातेचे सुपुत्र भगतसिंग, राजगुरू ,सुखदेव यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली करण्यात आली. शहीद दिनानिमित्त विद्यालयातील उपशिक्षक श्री एस एस पगार सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना भारत मातेचे शहीद वीर सुपुत्र यांच्या बलिदानाची माहिती दिली व त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकला. यावेळी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष ,सचिव, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ,सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी इन्कलाब जिंदाबाद भारत माता की जय या जयघोषाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
