
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२१९ वा दिवस
या मातृभुमीचे आपण पुत्र आहोत, या संस्कृतीचे आपण वारस आहोत, या राष्ट्राचे आपण एक जबाबदार घटक आहोत. म्हणूनच या देशाशी, भूमीशी, समाजाशी आपण सदैव कृतज्ञ असले पाहिजे. यांचे ऋणी असले पाहिजे. व्यक्तीशः आणि संघटितरीत्या आपल्या सर्वांना हे ऋण फेडावयाचे आहे. असे जर आपण केले नाही तर आपण माणूस म्हणून घेण्यास लायक नाही. आपली गणना पशुमध्येच करावी लागेल. आपला देश, आपली संस्कृती, आपला समाज आज संकटात आहे. आपण काही वेळीच केले नाही तर, देशाची पातळी घसरेल, संस्कृती दुर्बल होईल, समाजामध्ये भेद निर्माण होतील. असे झाले तर आपली सांस्कृतिक मूल्ये नष्ट होतील.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर चैत्र ३ शके १९४८
★ चैत्र शुद्ध /शुक्ल ६
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८३
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. २४ मार्च २०२६
★ १६७७ दक्षिण दिग्विजयप्रसंगी शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला.
★ १८५५ आग्रा आणि कलकत्ता यांदरम्यान तारसेवा सुरू झाली.
★ १९२९ लाहोर राष्ट्रीय काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरु झाले.
★ जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
