
सिन्नर ( प्रतिनिधी )२३ मार्च २०२६ शहिद भगत सिंग, शहिद सुखदेव, शहिद राजगुरु यांचा ९५ व्या शहिद दिनानिमित्त सिन्नर नगरपालिका कर्मचारी ,महामित्र परिवार,सीटू परिवार व आद्यक्रांतिकारक क्रांतिकारक राघोजी भांगरे ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथिल हुतात्मा चौक येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहिदांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारक शहिद झाले त्या पैकी शहिद भगतसिंग राजगुरू सुखदेव हे होत. इंग्रजांनी जालियनवाला बाग हत्याकांड केले. लाला लजपत राय यांचा पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला मृत्यु ह्यामुळे त्यांना मारणाऱ्या स्कॉटचा बदला घेत असताना साँडर्सला उडविण्यात आले. तसेच, ‘पब्लिक सेफ्टी’ बिला विरूध्द देशभर संताप व्यक्त होत होता या बिलावर सेंट्रल असेंब्लीत चर्चा चालू असताना बटूकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांनी असेंब्लित बाँब फेकून गोंधळ उडवून दिला. व त्यांनी स्वत : हून अटक करून घेतली. कोर्टात आपली बाजू प्रभावीपणे मांडली परंतु कोर्टाने त्यांना दोषी ठरवून भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना फाशीची शिक्षा फर्मावली. २३ मार्च १९३१ला ‘ इन्कलाब झिंदाबाद ‘ च्या घोषणा देत ते तिघेही हसत हसत फासावर चढले. देशासाठी आपले बलिदान दिले त्यांच्या स्मरणार्थ २३ मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो. ह्या शाहिद दिनानिमीत्त प्रत्येक स्तरावर शहिद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन केले पाहिजे असे ते म्हणाले.
या प्रसंगी कॉम्रेड हरिभाऊ तांबे,अनिल जाधव मा.मुख्याध्यापक दिपक जाधव सर मा.मुख्याध्यापक तुकाराम सदगीर सर प्रा.राजाराम मुंगसे सर रवींद्र देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय मुठे यांनी केले.व प्रास्ताविक हरिभाऊ तांबे यांनी केले.तर आभार ताहीर शेख यांनी मानले.
यावेळी महामित्र दत्ता वायचळे काॅम्रेड हरिभाऊ तांबे आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे प्रा.राजाराम मुंगसे सर केशव गोजारे मा.मुख्याध्यापक तुकाराम सदगीर सर मा.मुख्याध्यापक दिपक जाधव सर बाळासाहेब देशमुख दत्तात्रय आर्चय दिनेश ढोबळे किरण मुत्रक रवींद्र देशमुख अनिल जाधव ताहीर शेख अल्लाफ शेख विजय भाटजिरे किरण मुठे आदि उपस्थित होते.
