
शहिज जाट भगत सिंह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदगाव येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन मंगळवार दिनांक 24/03/2026 रोजी सकाळी 10.00 वाजता करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील STEP अंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक यांचे मार्फत शहिज जाट भगत सिंह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदगाव येथे “पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा-जागेवर निवड संधीचे” आयोजन करण्यात आले आहे.
सदर रोजगार मेळाव्यात नाशिक जिल्ह्यातील विविध औद्योगिक आस्थापना जिल्ह्यातील युवक/युवतींना विविध रोगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार आहे. सदर मेळाव्यात उपस्थित राहणाऱ्या आस्थापना मार्फत मुलाखती घेवून उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. सदर रोजगार मेळाव्याचा प्रशिक्षणार्थीनी लाभ घेण्याचे आव्हान संस्थेचे प्राचार्य श्री.जे.जे.पाटील तसेच गट-निदेशक श्री.एम.डी. निकुंभ यांनी केले आहे.
रोजगार मेळाव्याचे स्थळ:- शहिज जाट भगत सिंह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदगाव नवीन तहसिल कार्यालय जवळ, छ. संभाजी नगर रोड नांदगाव ता. नांदगाव जि. नाशिक
