
ओझर: (वार्ताहर) माधवराव बोरस्ते विद्यालयात शहीद दिनानिमित्त क्रांतिकारक भगतसिंग राजगुरू यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांच्या हस्ते होऊन अध्यक्षीय भाषणात क्रांतिकारक शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या विषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे भाऊसाहेब रौंदळ महेश पिंगळ आत्माराम शिंदे प्रभाकर लवांड महेंद्र डांगळे बाबासाहेब गायकवाड बाबासाहेब लभडे मंगल सावंत कीर्ती बच्छाव मनीषा पवार रेखा देशमाने शितल हांडोरे आदी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक शिक्षक नरेंद्र डेरले यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन आठवीच्या विद्यार्थ्यांनी केले. शुभ्रा शिंदे व श्रद्धा शिंदे इ.आठवीच्या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. सुप्रिया भंडारे व मोहिनी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. नवोदय परीक्षेस 63 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.

यापैकी 26 विद्यार्थी पास झाले. कु.साईच्छा विनायक गांगुर्डे 85 टक्के, कार्तिक रमेश आरगडे 83.75 टक्के, श्रीरंग शैलेश मोकळ 83.75 टक्के, अर्चना जितेंद्र शिंदे ८० टक्के गुण मिळवून एकूण चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. या विद्यार्थ्यांना शिक्षिका संगीता सोनवणे राजश्री मोहन अर्चना घुमरे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. फलक लेखन सविता पवार मोनाली निकम मोहन क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन नरेंद्र डेरले यांनी केले.आभार क्रीडा शिक्षिका मनोरमा सोमवंशी यांनी मानले.
