
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२१८ वा दिवस
आमचा स्वभाव जर केवळ आमच्याच सवयींनी बनलेला असेल तर आपण तो केव्हाही बदलून टाकू शकतो. तसे करणे आपल्याच हाती आहे. आमच्या मनामध्ये जे तरंग वा लाटा उठत असतात त्यांचा प्रत्येकाचा परिणाम असे एक एक चिन्ह मागे राहून जात असते. मागे राहिलेल्या चिन्हालाच संस्कार म्हणतात. आपले चारित्र्य म्हणजे या सगळ्या चिन्हांची म्हणजे संस्कारांची गोळाबेरीज होय. जो विशिष्ट प्रवाह वरचढ ठरतो तसा एकूण माणूस बनतो. जर चांगल्याचा प्रभाव वाढला वाढला तर माणूस चांगला होतो. वाईटाचा वर चष्मा झाला तर माणूस वाईट बनतो. आनंदीपणाचे प्राबल्य वाढले तर माणूस सुखी समाधानी होतो. सदैव पवित्र विचार बाळगत चला ; हीन संस्कार निवारण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.
स्वामी विवेकानंद..
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर चैत्र २ शके १९४८
★ चैत्र शुद्ध /शुक्ल ५
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८३
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. २३ मार्च २०२६
★ १९१० समाजवादी नेते, विख्यात संसदपटू राम मनोहर लोहिया यांचा जन्मदिन
★ १९३१ क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरु या तिघांना लाहोरच्या तुरुंगात रात्री साडेसात वाजता फाशी देण्यात आली. हुतात्म्यांचे पुण्यस्मरण.
वीर हुतात्म्यांना श्रध्दांजली….
★ २००७ मराठी साहित्यीक श्रीपाद नारायण पेंडसे यांचा स्मृतीदिन
★ शहीद दिन
★ जागतिक हवामान दिन.
