
सार्वजनिक वाचनालय पुस्तकं मित्र मंडळ व्याख्यान माला मध्ये वक्ते ऍडव्होकेट मिलिंद चिंधडे यांचे स्वागत करताना अध्यक्ष दिलीप फडके!! डावीकडून लक्षिमी कांत भट, सुहास टिपरे, रमेश कडलग, कार्याध्यक्ष संजय करंजकर, मंगेश मालपाठक, पुस्तकं उपक्रम प्रमुख व सहयायक सचिव सोमनाथ मुठाळ सर
नाशिक (प्रतिनिधी) सार्वजनिक वाचनालय,नाशिकच्या पुस्तक मित्र मंडळात ॲड. मिलिंद चिंधडे यांचे नुकतेच त्यांच्या “वकिलीच्या अंतरंगात “या पुस्तकावर व्याख्यान संपन्न झाले. हे पुस्तक 61 वकील,न्यायाधीशांच्या आत्मचरित्रांवरचे पुस्तक म्हणजे पुस्तकांवरचे पुस्तक आहे. व्याख्यानात सुरुवातीला त्यांनी त्यांच्या काळात केलेल्या पुस्तक मित्र मंडळाच्या उपक्रमाबद्दलही सांगितले.
व्याख्यानात त्यांनी आत्मचरित्र लिहिणाऱ्यांनी मूल्यांची पाठराखण कशी केली ते विशद केले. वकिलीच्या व्यवसायातील आदर्श समाजापुढे या पुस्तकाने आणले आहेत.हे पुस्तक लिहिण्याकरता पुस्तके कशी गोळा केली त्याचाही त्यांनी थोडक्यात आढावा घेतला. या पुस्तकात नाशिक जिल्ह्यातील बारा वकील आणि न्यायाधीशांची आत्मचरित्रे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.भविष्यातील सामाजिक आरोग्यासाठी समाजधारणा घडविण्यासाठी अशा प्रकारच्या पुस्तकांचे वाचन झाले पाहिजे, त्याच्यावर चर्चा केल्या गेल्या पाहिजेत.
सुरुवातीला प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुस्तक मित्र मंडळ प्रमुख श्री मंगेश मालपाठक यांनी केले. वक्त्यांचा परिचय प्राध्यापक सोमनाथ मुठाळ यांनी केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके हे होते. आभार प्रदर्शन प्राध्यापक लक्ष्मीकांत भट यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुहास टिपरे यांनी केले.
