
नाशिक ( प्रतिनिधी) नाशिक कवीने यावर्षीपासून जागतिक कविता दिनानिमित्त काव्यजागराचे आयोजन केले होते. सकाळी ९ वाजेपासून सुरू झालेला काव्यजागर दर तासाला वीस कविता या प्रमाणे संपन्न होऊन प्रत्येक तासाला निवडलेल्या दोन कवींमधून फायनल सोळा कवितांची निवड करण्यात आली या सोळा कवितांचे सादरीकरण समारोपाच्या सत्रामध्ये होऊन प्रा. सुनील हिंगणे आणि प्रा. प्रतिभा औटी यांनी या कवितांचे परीक्षण केले आणि अतिशय उत्कृष्ट अशा या कवितांमधून चैताली कापसे, नाशिक यांच्या बाबा माझं काळीज कवितेची निवड करून त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते काव्य करंडक प्रदान करण्यात आला. यावेळी बोलतांना प्रा. सुनील हिंगणे आणि प्रा. प्रतिभा औटी यांनी अंतिम फेरीतील सर्वच कविता सर्वोत्कृष्ट होत्या आम्हाला एका कवितेची निवड करतांना अतिशय कसरत करावी लागली. पण करंडक एकच द्यायचा असल्याने आम्ही एकमताने या कवितेची निवड केली असे प्रतिपादन केले.यावेळी सकाळी नऊ वाजेपासून सुरू झालेल्या काव्यजागरामध्ये प्रत्येक तासाला होणाऱ्या सत्रासाठी एक अध्यक्ष, दोन प्रमुख पाहुणे म्हणजेच परीक्षक आणि एक सूत्रसंचालक असे नियोजन करण्यात आले होते परीक्षक म्हणून प्र.द.कुलकर्णी, नरेश महाजन,अरुण सोनवणे,प्रशांत भरवीरकर, पियुष नाशिककर, राजेंद्र उगले, राज शेळके, राखी जोशी, मनोहर विभांडिक. रामचंद्र कुलकर्णी, आरती डिंगोरे, प्रवीण जोंधळे, जयश्री वाघ, सोमनाथ साखरे, प्रशांत केंदळे, गोरख पालवे आदी कवींनी काम पाहिले. सर्व सहभागी कवींना सहभाग प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. प्रास्ताविक कार्याध्यक्ष सुभाष सबनीस यांनी केले तर सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले उपाध्यक्ष बाळासाहेब गिरी यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर नाशिक कवीचे अध्यक्ष इंजी. बाळासाहेब मगर, कार्याध्यक्ष सुभाष सबनीस, कार्यवाह नंदकिशोर ठोंबरे, उपाध्यक्ष बाळासाहेब गिरी तसेच स्मिता बनकर, भारती देव, किरण मेतकर उपस्थित होते. नाशिक औरंगाबाद सिल्वासा सटाणा नांदगाव लासलगाव कळवण आधी ठिकाणाहून कवी आलेले होते अतिशय दिमाखदार अशा सोहळ्याची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. अंतिम फेरीतील सर्व कवींनी तसेच उपस्थितांनी चैताली कापसे यांच्या सादरीकरणाचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.
