
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२१७ वा दिवस
स्वतः श्रद्धासंपन्न व्हा व सारा समाज आणि देशही श्रद्धावान करा. नचिकेतेच्याप्रमाणे हृदयात अपार श्रद्धा बानवा आत्मतत्त्व जाणून घेण्यासाठी आत्मोद्धारासाठी, या जन्ममृत्यूचे कोडे सोडविण्यासाठी प्रसंगी नचिकेतेप्रमाणे यमलोकी प्रवेश करा. मृत्यूच्या जबड्यात जाण्याने जर सत्यलाभ होणार असेल तर बेधडक मृत्यूच्या मुखांत प्रवेश करावयास मागे पुढे पाहू नका. भय म्हणजे तर मृत्यु. हे भयच ओलांडून जावयास हवे. या क्षणापासून भयशून्य होऊन जा. आपल्या मोक्षासाठी, लोकांच्या कल्याणासाठी आणि राष्ट्राच्या उद्धारासाठी देहत्याग करावयास पुढे सरसावयास हवे.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर चैत्र १ शके १९४८
★ चैत्र शुद्ध /शुक्ल ४
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८३
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. २२ मार्च २०२६
★ १९८४ लेखक आणि पत्रकार प्रभाकर पाध्ये यांचा स्मृतीदिन
★ २००४ कायदेपंडित आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बॅरिस्टर व्ही. एम. तारकुंडे यांचा स्मृतीदिन.
★ जागतिक जल दिन.
