
नांदगाव ( प्रतिनिधी) “आठवणीतील कुसुमाग्रज ” हे एक सुंदर संग्रही असावे असे पुस्तक भेट मिळाल्याचा आनंद झाला. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित असलेले नाशिक जिल्ह्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व कुसुमाग्रज यांच्या सहवासात आलेल्या लेखकांनी त्यांच्या आठवणी लिहून त्या जाग्या केल्या. असे दुर्मिळ पुस्तक भेट मिळाले हे माझे भाग्यच समजतो. त्यांचा सहवास आम्हाला लाभु शकला नाही ही खंत देखिल आ.सुहास आण्णा कांदे यांना पुस्तक भेट देताना त्यांनी व्यक्त केली.

अशा महान व्यक्तीचा, साहित्यिक, व विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आढावा नव्यापीढीतील लेखकांनी घेतला पाहिजे असा विचार त्यांनी यावेळी व्यक्त केला. रामदास नागवंशी यांनी कुसुमाग्रज यांचे “आठवणीतील कुसुमाग्रज” या पुस्तकात सामाजिक , राजकीय, साहित्यिक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तात्यासाहेब यांच्या सहवासात येवुन त्यांना आलेल्या अनुभवांचे कथन सुंदर स्वरुपात मांडलेल्या आहेत. संपादक रामदास नागवंशी यांचे अभिनंदन व त्यांच्या साप्ताहिक कुसुमाग्रज नगर या साप्ताहिकाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

हे पुस्तक देण्यासाठी कवीवर्य व लेखक प्रा. सुरेश नारायणे,ॳॅड. उमेशकुमार सरोदे, राजेंद्र कुटे, गणेश भाऊ गांगुर्डे, आदी मान्यवरांच्या हस्ते पुस्तक भेट देण्यात आले.
