
नाशिक ( प्रतिनिधी) नाशिक कविच्या वतीने जागतिक कविता दिनानिमित्त शनिवारी दि. २१/०३/२०२६ रोजी पंचवटीतील भावबंधन मंगल कार्यालयात काव्य करंडक स्पर्धा होईल.सकाळी नऊ ते सायंकाळी सात असे सलग दहा तास कवितांचे सादरीकरण होईल. प्रत्येक सत्रातुन दोन कविंची निवड केली जाणार असून समारोपाच्या सत्रात प्रत्येक सत्रातील निवड झालेले कवी सादरीकरण करतील त्यातुन एका कवीची निवड करुन त्यांना काव्य करंडक प्रदान केला जाणार आहे. बाळासाहेब मगर, सुभाष सबनीस,स्मिता बनकर , नंदकुमार ठोंबरे आदींनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
